Installieren Sie die genialokal App auf Ihrem Startbildschirm für einen schnellen Zugriff und eine komfortable Nutzung.
Tippen Sie einfach auf Teilen:
Und dann auf "Zum Home-Bildschirm [+]".
Bei genialokal.de kaufen Sie online bei Ihrer lokalen, inhabergeführten Buchhandlung!
मृत्यू ज्यावेळेस आपल्या दाराशी उभा असतो, त्यावेळेस जिवंत असण्याच्या आणि मृत्यूच्या मधलं अंतर अनुभवणं नेमकं काय आणि कसं असू शकतं हे ऋषिकेशने अशा प्रकारे मांडलेलं आहे की वाचकाला देखील त्या घालमेलीची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. ऋषिकेशचा हा १७ दिवसांचा प्रवास फारच 'डार्क' आहे, पण त्याच्या झगड्याच्या पहिल्या दिवसापासून ते अखेरपर्यंत या काळ्याकुट्ट अंधाराच्या भोवती असलेली चंदेरी किनार आपलं अस्तित्व दाखवल्याशिवाय राहत नाही. १७ दिवस म्हणजे ऋषिकेशच्या आयुष्यातील भयावह दिवसांचं नुसतं वर्णन नाहीये तर त्या मरणप्राय यातनांमध्ये त्याला काय गवसत गेलं याची अनुभूती आहे. काही काही पानांवर तर त्यानं मांडलेलं आत्मज्ञान हे वाचन थांबवून चिंतन करायला लावतं... अंतर्मुख व्हायला लावतं आणि ही काळकोठडी कशी त्याच्या गाभ्याशी असलेल्या आत्मप्रकाशाला प्रज्वलित करते याचं दर्शन घडवते. (डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रस्तावनेमधून)
डॉ. ऋषिकेश जाधव
बी.ए. एम्. एस्; एम्. डी. (आयु)
१. स्वर्णायु आयुर्वेद चिकित्सालय, कोल्हापूर येथे १५ वर्षांपासून मुख्य आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत
२. शुभंकर पब्लिकेशन्स प्रा. लि. या प्रकाशन संस्थेचे कार्यकारी संचालक
३. 'स्वर्णायु' या वार्षिक आरोग्य विशेषांकाचे मुख्य संपादक
४. संवेदना फौंडेशन, कोल्हापूर या रस्ते अपघात आणि वाहतूक सुरक्षेसंदर्भात जनजागृती करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत
५. कॅन्सरमुक्त समाजाचे ध्येय समोर ठेवून, कॅन्सरमुक्ती अभियाना अंतर्गत गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ कॅन्सर रुग्णांमध्ये मोफत आयुर्वेद उपचार व कॅन्सरविषयी जनजागृतीसाठी विविध माध्यमांमधून लेख व व्याख्यानांचे आयोजन
साहित्यिक वाटचाल:
१. 'नज़्म - ए - ऋषि' हा हिंदी कविता आणि गझलांचा संग्रह
२. '१७ दिवस: एक द्वंद्व' - स्वानुभवावर आधारित कोविड १९ च्या संसर्गादरम्यानचा आत्मकथनपर प्रवास
३. 'मला मुलगी हवीय' : स्त्रीभ्रूणहत्येवर भाष्य करणारी कादंबरी (प्रकाशनाच्या वाटेवर)
४. 'विस्मरण' : अल्झायमर या भयंकर आजारावर भाष्य करणारी कादंबरी (प्रकाशनाच्या वाटेवर)
५. 'नाव हरवलेला माणूस' : लघुकथा संग्रह (प्रकाशनाच्या वाटेवर)